औरंगाबाद- बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या उपस्थितीत फुलंब्री मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राजकीय डाव खेळला माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे कट्टर समर्थक असलेले त्यांच्याच गावातील कर्त्याकर्यांना भाजप प्रवेश देऊन डॉ. काळे यांच्या राजकीय अस्तित्वाला हरिभाऊ बागडे यांनी सुरुंग लागला. नानांच्या या राजकीय डावाला आता माजी आमदार डॉ. कल्याण काळे हे कसे प्रतिडावाने उत्तर देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याबाबत डॉ. कल्याण काळे यांच्याशी सांजवार्ता ने संपर्क साधला असता त्यांचा फोन नॉटरिचेबल होता.
पिसादेवी ग्रामपंचायत तसेच औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतील मातब्बर आणि माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे कट्टर समर्थक असलेले कार्यकर्ते भाजपात ओढून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डॉ. काळे यांच्यासमोर आगामी निवडणुकीसाठी राजकीय डावपेच खेळत मोठे आव्हान निर्माण केले आहे. राजकीय आणि वैचारिक मतभेद बदलले असले तरी मतभेद आमच्यामध्ये नाही. फुलंब्रीतील विकासकामांसाठी आम्ही सदैव एकत्र राहू अशी प्रतिक्रिया भाजपात गेलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांजवार्ताशी बोलताना नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिल्या. माजी आमदार डॉ. कल्याण काळे हे आता यापुढे काय भूमिका घेतील? नानाच्या या राजकीय डावाला फुलंब्री विधानसभा मतदार संघात राजकीय डावांनीच कसे प्रतिउत्तर देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.